#Social
अंबाजोगाईत निघाला भव्य हिंदू धर्मरक्षण मुकमोर्चा…..!
अंबाजोगाई दि. १० – (पांडुरंग केंद्रे) मंगळवारी सकाळी हा मोर्चा कुत्तरविहीर परिसरातील तानाजी मालुसरे चौकातून निघाला. यावेळी मध्यवर्ती हनुमान मंदिरात महाआरती करुन मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचला. यावेळी मोर्चातील प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले.
सदरील मोर्चा हा माता भगिनींच्या रक्षणासाठी, गोमातेच्या संवर्धनासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी निघाला होता. लव्ह जिहाद व बळजबरीने धर्मांतर विरोधी कायदा संपुर्ण देशात लागू करण्यात यावा, गो हत्या रोखण्यात याव्यात इत्यादी मागण्या मांडण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्चात अंबाजोगाई तालुक्यातून हिंदू समाज बांधव व महिला युवकांचा मोठा सहभाग होता. व भगवे झेंडे, भगव्या टोप्यानी वेधले लक्ष निघालेल्या भव्य हिंदू मोर्चात प्रत्येक मोर्चेकरांनी भगवी टोपी परिधान केली होती.
मोर्चामध्ये भगव्या झेंड्यानी लक्ष वेधले.बरेच शेतकरी व पशुपालकांना आपल्या गाई मोर्चात आणुन पशुपालन व गोमातेचे रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला. निघालेल्या हिंदू धर्मरक्षण मुकमोर्चासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस पथकाची एक तुकडी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आली होती. दुकाने बंद ठेवुन धर्मनिरपेक्ष मोर्चात शहरातील बसस्थानक परिसर, मंडीबाजार मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, कुत्तरविहीर परिसरातील अनेक व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवुन मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.