क्राइम
सावत्र भावाचा २७ वर्षीय महिलेवर अत्याचार…..!
केज दि.२४ – पतीसोबत भांडण झाल्याने तीन महिन्यापासून माहेरी राहत असलेल्या २७ वर्षीय महिलेवर तिच्या सावत्र भावाने शेतात ओढत नेत बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार पाहून सावत्र वडिलांनी पिडीतेस वायरने मारहाण केल्याची घटना केज ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
२७ वर्षीय पिडीत महिलेस दोन मुले, एक मुलगी असून तीन महिन्यापूर्वी सोयाबीन काढण्यास न गेल्यावरून तिच्या पतीने भांडण केले. म्हणून ती माहेरी आली होती. माहेरी राहत असताना तिचे व तिच्या २५ वर्षीय सावत्र भावाचे दोघांच्या संमतीने दोन वेळा शारीरिक संबंध आले होते. २१ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घरी कोणी नसताना सावत्र भावाने शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र तिने इच्छा नसल्याचे सांगून टाळले. त्यानंतर सावत्र भावाने तिला घरामागील शेतात नेऊन बळजबरीने अत्याचार केला.
दरम्यान, ते दोघे घरात नसल्याचे पाहून तिचा सावत्र वडिल शोध घेत त्यांच्या जवळ आला. त्याने तो प्रकार पाहून पिडीतेस वायरने पाठीवर, डोक्यावर, हातावर मारहाण केली. अशी फिर्याद पिडीत महिलेने दिल्यावरून तिचा सावत्र भाऊ व मारहाण करणाऱ्या सावत्र वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करत आहेत.