#Judgement
आसाराम बापूला जन्मठेप……!
शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सोमवारी (30 जानेवारी) दोन बहिणींवरील बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होत. यानंतर आज त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आसारामच्या (Asaram Bapu) पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
सुरतमधील एका महिलेने केला होता बलात्काराचा आरोप
अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आसारामने 2001 ते 2006 दरम्यान महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला, जेव्हा ती शहराच्या बाहेरील आश्रमात राहत होती. ऑक्टोबर 2013 मध्ये सूरत येथील एका महिलेने आसाराम आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. खटला सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला. जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आसाराम बापू हा सध्या राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, पीडितेच्या लहान बहिणीवर आसारामचा मुलगा नारायण साई याने बलात्कार करून तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होते. एप्रिल 2019 मध्ये 2013 मध्ये त्याच्यावर नोंदवलेल्या बलात्काराच्या प्रकरणात सईला सुरतच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.