#Judgement

मारहाणीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्ताता…..!

6 / 100
केज दि.३ – येथील 3 रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी केज येथे फौजदारी केस क्रमांक  80/2017 सरकार वी. दयानंद गव्हाणे व इतर 3 याप्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी दयानंद गव्हाणे व इतर तीन राहणार बोरगाव ता. केज जि. बीड यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
    सदरील प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, दि.14/12/2017 रोजी यातील फिर्यादी बळीराम गव्हाणे यांनी फिर्याद दिली की, दिनांक 14 /12 /2017 रोजी सकाळी नऊ वाजता सुमारास ते त्यांचे घरासमोर असताना आरोपी क्र. 1 ते 4 तेथे आले व त्यांनी तु आमचे विरुद्ध न्यायालयात दावा दाखल का केला अशी कुरापत काढून कुऱ्हाडीने डोक्यात मारहाण केली अशी फिर्याद दिली. त्यावरून आरोपींचे विरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यावरून संबंधित पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध तपासांती दोषारोप पत्र मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी साहेब केज यांच्या न्यायालयात दाखल केले.
             सदरील प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु आरोपीचे वकील यांचा बचाव,व युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी दयानंद अनंता गव्हाणे व इतर तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
           आरोपींच्या वतीने ऍड. जे. डी. चाळक यांनी काम पाहिले तर त्यांना ऍड.चिंचकर, ऍड.धेंडुळे,ऍड.जाधव, ऍड.करपे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close