#Judgement
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा……!
सुरत दि. २३ – सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात? असं वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. कोर्टाने जामीन दिल्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.