राजकीय
भाजप नेते रमेश आडसकर यांची प्रदेश कार्यकरिणीवर वर्णी….!
केज दि.३ – आपल्या संघटन कौशल्याने बीड जिल्ह्यातील गावागावात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या रमेश आडसकर यांची भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणीवर सदस्य पदी निवड करण्यात आल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांच्या या निवडीने माजलगाव – केज मतदारसंघातून भाजप कार्यकर्ते, नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
रमेश आडसकर यांनी बीड जिल्ह्यात आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला आहे. पक्षाचे विचार, संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न, स्थानिक संस्थेवरील त्यांची पकड या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितल्या जात आहे.
भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार रमेश आडसकर यांची भाजपा प्रदेश कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.