आपला जिल्हा

केज शहरात आणखी दोन कंटेन्मेंट झोन घोषित

25 अहवालाची प्रतीक्षा

केज दि.२ – केज शहरात मागच्या दोन दिवसांपूर्वी भवानी चौकात एक कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर संबंधित भाग कंटेन्मेंट झोन घोषित केला होता. मात्र काल तालुक्यात दोन रुग्ण आढळून आल्यामुळे शहरातील अजीजपुरा तसेच मंगळवार पेठ मधील एक रुग्ण (पुणे प्रवासित) बाधित आढळून आल्याने तो भाग व तालुक्यातील ढाकेफळ ह्या गावात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. अजीजपुरा, मंगळवार पेठेत व ढाकेफळ येथे सर्व्हे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली असून आज तालुक्याला 25 अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान दिवसेंदिवस तालुक्यात सातत्याने एक दोन रुग्ण आढळून येत असल्याने हळूहळू संख्या वाढू लागली असून आरोग्य प्रशासना समोर आव्हान उभे राहिले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close