ब्रेकिंग

केज शहराची टपऱ्यांचे शहर म्हणून असलेली ओळख पुसल्या जाणार…..?

9 / 100

(प्रतिकात्मक फोटो)

केज दि.१३ – मागच्या कित्येक वर्षांपासून केज शहराची ओळख ही टपरीचे शहर म्हणून झालेली आहे. मात्र आता प्रशासनाने सदरील अतिक्रमणावर हातोडा उचलण्याचा निर्धार केला असून अतिक्रमण धारकांना 15 तारखेपर्यंत आपापले अतिक्रमण काढून घेण्याची मुदत दिली असून जे कोणी काढणार नाहीत त्यांच्या अतिक्रमणावर दिनांक 16 रोजी हातोडा पडणार असल्याची माहिती केज प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

         सोमवारी केज तहसील मध्ये शहरातील सर्व खाते प्रमुखांची बैठक उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी शहरातील शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूला असलेले तसेच मेन रोडवर असलेले अतिक्रमण पूर्णपणे काढून टाकण्याचा सदरील बैठकीत निर्णय झाला आहे. आणि तश्या सूचना सर्व खाते प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे दिनांक 15 जून पर्यंत काढून घ्यावीत अन्यथा दिनांक 16 रोजी कुणाचीही गय न करता अतिक्रमण काढण्यात येईल असा इशारा सर्व अतिक्रमणधारकांना देण्यात आलेला आहे.                                    दरम्यान,मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे आता निघणार असल्याचे निश्चित झाले आहे आणि टपरीचे शहर म्हणून जी केज शहराची ओळख आहे ती पुसल्या जाण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close