केज दि.16 – तालुक्यातील आंधळेवाडी येथे एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. सदरील तरुणाने वडीलावर असलेल्या कर्जाच्या नैराश्यातून गळफास घेतला असल्याचे सांगितल्या जात आहे. 25 years old youth ended life by hanging
केज तालुक्यातील आंधळेवाडी येथील संतोष दैवान आंधळे या तरुणाने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शेतकरी कुटुंबातील संतोष हा वडिलांवर असलेल्या कर्जामुळे निराश होता. कर्ज कसे फेडायचे ? या विवंचनेतूनच त्याने गळफास घेतला असल्याचे बोलल्या जात आहे. Suicide in kaij tahshil
सदरील तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात केल्यानंतर आंधळेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.