महाराष्ट्र

वैद्यकीय अधिकारी वृद्धांची लूट करत असल्याची मनसेची तक्रार…..!

9 / 100

बुलडाणा दि.१९ – वृद्ध व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेसाठी जे वयाचे प्रमाणपत्र लागते ते प्रमाणपत्र देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वेरूळकर हे वृद्धांकडून पैसे घेत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. सदरील तक्रारीची दखल घेऊन डॉक्टर स्वप्नील वेरुळकर यांचा पदभार काढून घेतला मात्र त्यांची कसल्याही प्रकारची चौकशी न करता व तक्रारदाराला त्याची माहिती न देता पदभार काढून घेतला असल्याची तक्रार पुन्हा जळगाव जामोद चे मनसेचे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी केली आहे.

            बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वेरुळकर हे वृद्धांची लूट करत आहेत. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत आहेत अशी तक्रार जळगाव जामोद चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती. सदरील तक्रारीची दखल घेऊन निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी एक समिती गठीत करून डॉक्टर स्वप्नील वेरूळकर यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर सात जुलै रोजी त्यांचा पदभार काढून घेतला. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी पुन्हा तक्रार दिली असून त्यामध्ये सदरील डॉक्टरची चौकशी न करताच त्यांचा पदभार काढून घेतला असल्याचे म्हटले आहे. मात्र तक्रार दिल्यापासून सदरील डॉक्टरची काय चौकशी करण्यात आली ? याची माहिती देण्याची मागणी केली आहे. अन्यथा ज्या वृद्धांची लूट झाली अशा सर्व वृद्ध व्यक्तींना घेऊन आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही नागेश भटकर यांनी दिला होता.परंतु चौकशीसाठी नेमलेल्या समितीने केलेला चौकशी अहवाल पाहून सदरील डॉक्टर वर कारवाई केली जाईल असे तोंडी आश्वासन दिल्याने नागेश भटकर यांनी तूर्त उपोषण केले नसल्याची व संबंधित डॉक्टर ला निलंबित करण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगितले.
              दरम्यान, नागेश भटकर यांनी तक्रारीत वैद्यकीय अधिकारी डॉ. वेरूळकर हे कशा प्रकारे वृद्धांची लूट करत आहेत याचे पुरावेही असल्याचे म्हटले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close