याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर तालुक्यातील पिंपरवाडा येथील श्रीकृष्ण कारभारी तिडके हे आपल्या पत्नीसह सोनिमोहा या त्यांच्या सासरवाडीस बुधवार दि. 23 रोजी गेले होते. सांयकाळी सोनिमोहा येथून परतत असताना धारुर Dharur शहरात एका हॉटेलमध्ये चहा घेवून पिंपरवाडा गावाकडे आपल्या दुचाकीवरुन निघाले. पिंपरवाडा घाटात Ghat पाठीमागून येणाऱ्या स्कार्पियो गाडीतील अज्ञात चौघांनी दुचाकीस आढवे येवून गाडी आडवली. सदर चौघांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने व जवळचे 20 हजार नगदी रोख रुपये मारहाण करत लुटले. यात पती पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटनेनंतर धारुर पोलिस Police ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून तालुक्यात चोरी व लूटीचे प्रकार वाढत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.