ब्रेकिंग

दहावीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण…..!

6 / 100
केज दि.४ – मॉर्निंग वॉकला गेलेल्या दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना केज शहरात घडली आहे.
                 सदरील मुलगी ही केज येथे तिच्या आईसोबत राहात आहे. ती शहरातील एका विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सदरील मुलगी ही नेहमीप्रमाणे सकाळी ६ वा. च्या सुमारास बीड रोडने मॉर्निंग वॉकला गेली होती. सकाळी ८ वाजून गेल्या नंतर ती घरी परत आली नाही म्हणून तिच्या घरच्या नातेवाईकांनी केज शहरात आणि इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच तिचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.
              दरम्यान, मुलीच्या आईच्या तक्रारी अपहरण केल्या प्रकरणी गु. र. नं. ५२१ / २०२३ भा. दं. गु.र.नं. ५२१/२०२३ वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close