ब्रेकिंग

विडा येथे पिकअप दुचाकी अपघातात दोन ठार  

बुरंडवाडी येथील तरुण

केज दि.20 – पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार  तर दुचाकीवरील दुसरा तरुण उपचारापूर्वी मयत झाला. हा अपघात केज तालुक्यातील विडा गावालगत असलेल्या तळ्याजवळ गुरुवारी ( दि. २० ) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला. 

केज तालुक्यातील बुरंडवाडी येथील धनराज रंगनाथ भोसले ( वय ३० ) व सुशेन जालिंदर भोसले ( वय २५ ) हे दोघे गुरुवारी केजला कामानिमित्त गेले होते. काम आटपून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ( एम. एच. ४४ डब्ल्यू ५६९६ ) परत गावाकडे  निघाले होते. त्यांची दुचाकी केज – विडा रस्त्यावरील विडा गावालगत असलेल्या तळ्याजवळ आली असता विडा येथून घाटेवाडीकडे निघालेल्या पिकअपचा ( एम. एच. २३ डब्ल्यू ०३२१ ) आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील धनराज रंगनाथ भोसले ( वय ३० ) हा तरुण जागीच ठार झाला. तर सुशेन भोसले हा तरुण गंभीर झाला असता त्याला उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचाही मृत्यू झाला आहे. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच केजचे फौजदार श्रीराम काळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, पोलीस नाईक धनपाल लोखंडे, पोलीस नाईक श्रीराम चेवले हे घटनास्थळी दाखल झाले होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close