आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

डॉ. अशोक थोरात यांनी हाती घेतली रुग्णालयांचे आरोग्य सुधारण्याची मोहीम….!

6 / 100

केज दि. २४ – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे बीड येथे रुजू झाल्यानंतर सरकारी रुग्णालयाचे बिघडलेले आरोग्य सुधारण्याची मोहीम हाती घेतली आहे. नियमित ते विविध उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाला भेटी देऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या सेवा सुविधांचा आढावा घेत आहेत.आणि कमतरता पूर्ण करण्यासाठी सूचना देत आहेत.

डॉ. अशोक थोरात केज जेथे असताना त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेमध्ये सुरळीतपणा आणलेला होता. मात्र पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडला रुजू झाले आणि त्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे झाली. परंतु मागच्या तीन-चार वर्षांमध्ये बीड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांच्या तक्रारी वाढल्या असून रेफर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. तसेच रुग्णांना बाहेरून औषधी आणाव्या लागतात अशाही तक्रारी दिसून येत आहेत. काही ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहेत मात्र रेडिओलॉजिस्ट नसल्याने त्या धुळखात पडून आहेत. त्यामुळे डॉक्टर अशोक थोरात यांनी बीडला रुजू झाल्यानंतर या सर्व गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून मंगळवारी केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी भेट दिली आणि पत्रकारांशी संवादही साधला. यादरम्यान पत्रकारांनी केजच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक कमतरता असल्याचे डॉ. अशोक थोरात यांना सांगितल्यानंतर त्यांनी सर्व बाबींची नोंद करून लवकरात लवकर ज्या सेवा रुग्णांना मिळत नाहीत त्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

          रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन आहे परंतु रेडिओलॉजिस्ट नसल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे डॉक्टर थोरात यांनी या बाबीची गंभीर दखल घेत दर बुधवारी आणि शनिवारी केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे रुग्णांना सोनोग्राफी मशीन चा फायदा घेता येणार असून औषधीही शक्यतो रुग्णांना बाहेरून विकत आणावी लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.                                                 दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना अनेक तक्रारींवर चर्चा झाली. आणि त्यात सर्व तक्रारींचा निपटारा करण्याचा शब्द डॉक्टर अशोक थोरात यांनी दिला. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे यांना तशा सूचनाही दिल्या. या बैठकीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन राऊत रक्तपेढीचे श्रीकृष्ण नागरगोजे यांचीही उपस्थिती होती

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close