आपला जिल्हा

देशातील पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…..! 

6 / 100
मुंबई दि.२९ – भारतीय नागरिक सुरक्षा सहिंता कायद्यानुसार ज्या प्रकरणात सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञांकडून घटनास्थळांवर भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेल्या देशातील पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन चे सोमवारी राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
                   सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री, राज्यमंत्री गृह डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलिस महासंचालक न्यायिक आणि तांत्रिक संजय वर्मा, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई संचालक डॉ.संगीता घुमटकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मधील विविध तांत्रिक सामग्रीची माहिती देण्यात आली. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मधील सहायक रासायनिक विश्लेषक तथा व्हॅन इन्चार्ज ऋषिकेश पाखरे यांनी फॉरेन्सिक किटचा प्रभावी  वापर करून घटनास्थळवरील पुरावे गोळा करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  सह्याद्री अतिथिगृह येथे बनविलेल्या प्रायोगिक घटनास्थळाचे विश्लेषण केले.
          दरम्यान, ऋषिकेश पाखरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फॉरेन्सिक एक्स्पर्ट म्हणून प्रमाणित करण्यात आले. ऋषिकेश पाखरे हे बीड येथील मुख्याध्यापक शिवाजी पाखरे आणि मुख्याध्यापिका अनुराधा पाखरे यांचे पुत्र आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल ऋषिकेश यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close