क्राइम

स्व. महादेव मुंडे हत्या प्रकरणाला आला वेग….!

6 / 100 SEO Score
बीड दि.६ – मागच्या कांही महिन्यांपूर्वी आयपीएस पंकज कुमावत जिल्ह्यात कार्यरत असताना गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते. पंकज कुमावत यांचे नाव ऐकताच गुन्हेगारांना धडकी भरत होती त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. मात्र त्यांची बदली झाली आणि गुन्हेगाराने डोकेदुखी वर काढले. मात्र आता पुन्हा एका गुन्ह्याची उकल करण्याची जबाबदारी कुमावत यांच्यावर दिली असून जिल्ह्यात ते ऍक्टिव्ह झाले आहेत. आणि त्याच गुन्ह्याची उकल करण्यासाठी महादेव मुंडे यांच्या हत्येसंदर्भात कुणाला काही माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
           सदरील आवाहनात म्हटले आहे की, स्वर्गीय महादेव दत्तात्रय मुंडे रा. भोपला ता. परळी वै. ह.मु. बॅक कॉलनी परळी वै. यांची दि. २१/१०/२०२३ रोजी रात्री ०८.०० ते ९.०० वा. च्या दरम्यान परळी कोर्टासमोरील मोकळ्या मैदानात हत्या झालेली असून सदर प्रकरणा संबधाने पोलीस ठाणे परळी शहर येथे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा रजिस्टर नं.१९१/२०२३ कलम ३०२. भां.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
                       सदर गुन्हयातील आरोपीतांचा अद्याप पावेतो शोध न लागल्याने IPS श्री. पंकज कुमावत (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्यात आली असून. SIT पथकाने पुढील तपास सुरु केलेला आहे. स्वर्गीय महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्ये बाबत काही माहिती असल्यास अथवा त्या बाबतची माहिती देणे असल्यास. IPS श्री. पंकज कुमावत (भा.प्र.से) यांना त्यांचा वैयक्तिक मो. ९९९०७८२४३१ वर माहिती देवु शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपणीय ठेवण्यात येईल. माहिती देणाऱ्याचे नाव कोणत्याही परिस्थितीत उघड केले जाणार नाही. तसेच माहिती देणाऱ्यास उचित बक्षीस देण्यात येईल.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close