केज शहरातील गॅस एजन्सी मध्ये काम करणारा अशोक सौदागर हा कोल्हापूरकडे देवदर्शनासाठी इतर काही जणांबरोबर गेला होता. मात्र कोल्हापूर नजीक असलेल्या एका नदीमध्ये रविवारी सकाळी सहा वाजता आंघोळ करत असताना पाण्यात बुडून अशोक चा दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र अशोक संपूर्ण केज शहरांमध्ये अतिशय तत्पर सेवा देणारा ”गॅस बॉय” म्हणून सर्वांना परिचित होता. नम्रतेने बोलणे आणि तेवढेच तत्परतेने सेवा देणे या त्याच्या गुणांमुळे तो सर्वपरिचित झालेला होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून त्याच्या प्रती असलेल्या संवेदना व्यक्त होताना दिसत आहेत. अशोकच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन अपत्य आहेत.