#Social

श्रीराम तांदळे यांच्या प्रयत्नांना आले यश…..!

7 / 100 SEO Score
केज दि.२३ – अनाथ मुलांच्या हक्का साठी झटणाऱ्या श्रीराम तांदळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. नाशिक विभागातील विद्युत सहाय्यक पदा साठी निवड झालेले १० अनाथ उमेदवार अनेक दिवस नियुक्ती न मिळाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. काहींनी आत्महत्येचाही विचार केला होता.या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्रीराम तांदळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या मुलांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावला.
             नाशिक येथील संबंधित वीज विभागातील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात अनावश्यक विलंब होत होता.तांदळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न थेट वरिष्ठ पातळीवर नेला.पुणे महिला व बाल विकास कार्यालयात तसेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा विषय ठामपणे मांडण्यात आला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनी विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय  कार्यालयात तातडीने बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (नाशिकविभाग) यांना संबंधित १० अनाथ मुलांना नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सर्व १० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून त्यांनी विद्युत सहाय्यक पदावर रुजू होण्यास सुरुवात केली आहे.या यशामुळे संबंधित मुलां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य व भविष्याची दिशा मिळाली आहे.
             दरम्यान, “अनाथ मुलांचे शिक्षण, पुनर्वसन व नोकरीच्या संधीसाठी मी सदैव कार्यरत राहीन.अशा मुलांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास मला निःसंकोच संपर्क साधावा,” असे आवाहन श्रीराम तांदळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close