#Social
सामाजिक कार्यकर्ते नरहरी काकडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…..!

केज दि.१२ – तालुक्यातील साबला येथील सामाजिक कार्यकर्ते,आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त नजीर काझी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करुन सय्यद पाशा पिर साहेब दर्गा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी चेरमन उत्तमराव काकडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, पवन सरवदे,खैरात काझी, खमरोद्दीन काझी, गणेश कटारे, रामचंद्र राऊत,राहुल मुळे, लखन राऊत, ऑपरेटर नखाते, गुलाब मुळे, आश्रुबा नाईकनवरे, शिवशंकर नाईकनवरे, सावताराम नाईकनवरे, शिवाजी काकडे, बालाजी काकडे, बाबासाहेब काकडे, शिवाजी परळकर तसेच जि.प.प्रा.शाळा, साबला.मु.अ.धाट, लोंढे यांच्यासह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.