#निधन वार्ताब्रेकिंग
केज शहरातील 33 वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…..!
केज दि. १७ – शहरातील ‘फारोकी मेडिकल’चे संचालक आणि डी-फार्मसी पदवीधारक तरुण उद्योजक तबरेज फारोकी (वय ३३) यांचे आज सकाळी ११ वाजता बीड येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने केज शहरात शोककळा पसरली आहे.
बीड येथे जमातसाठी गेले असता झाला धक्का
तबरेज फारोकी हे काही दिवसांपासून धार्मिक कार्यानिमित्त (जमात) बीड येथे गेले होते. आज सकाळी 11 वाजता हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अत्यंत नम्र स्वभावाचे व्यक्तिमत्व
तबरेज फारोकी हे केज शहरातील पत्रकार रियाज फारोकी यांचे धाकटे बंधू होते. ते व्यवसायाने फार्मासिस्ट असून, ‘फारोकी मेडिकल’च्या माध्यमातून ते रुग्णांची सेवा करत असत. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, नम्र आणि मिळून-मिसळून राहणारा होता. त्यांच्या निधनाने फारोकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंत्यविधी आज रात्री
तबरेज फारोकी यांचा अंत्यविधी आज (दि. १७ जुलै) रात्री ११ वाजता केज येथील मरकज मस्जिद येथे पार पडणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शहरातील मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.