बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर…..!
बीड जिल्हा क बीड दि. १८ – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या प्रस्तावास अधिकृत मान्यता दिली आहे. बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी ही अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे.या नवीन कार्यकारिणीत जिल्ह्यातील अनुभवी आणि अभ्यासू कार्यकर्त्यांना विविध पदांची जबाबदारी सोपवून पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रविणकुमार भाऊराव शेप, नवनाथ रामनाथ थोटे, जुबेर मकराणी चाऊस, प्रकाशराव लक्ष्मणराव देशमुख, वसंतराव मोरे, अशोक विश्वनाथ बहिरवाल, बिलकीस कच्छी, हनिफ करिम सय्यद, प्रविण योगीराज मेटे. तर कोषाध्यक्ष म्हणुन बिपीनचंद्र शाहूराव ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सरचिटणीस म्हणुन रमेश पाटील, आझम पाशा, विश्वनाथराव गायकवाड, अशोक बाजीराव केकान, गणेश कल्याणराव शिंदे, हरिभाऊ सावंत, अॅड. विलास जोशी, बिबीषण बाबुराव रसाळ, श्रीनिवास बेदरे, मिलींद बाबुराव मस्के, सिध्देश्वर देवराव रणदिवे, ज्ञानेश्वर आबासाहेब आंधळे, आनंदराव कोकाटे, एहेतेशाम खतीब, अॅड. इनामदार मशीयोद्दीन हबीबोद्दीन, शेख सिराज भाई, संभाजी जाधव, अशोक जगन्नाथ पायमोडे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी अॅड. विशाल मस्के, देविदास जीवराज गुंड, अॅड. सय्यद याकुब मेहमूद, रावसाहेब घाडगे, अनिल पालेकर, विजय सोनवणे, दादासाहेब तासतोडे, मनोज महादेव इंगळे, अच्युत इंगळे, सोपान टेकाळे, अंकुश पाचपुते, मारोतीराव पवळ पप्पुकाका घुमरे यांची निवड झाली. तर कायम निमंत्रित सदस्य म्हणुन जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कार्याध्यक्ष, जिल्ह्यातील पक्षाचे माजी मंत्री, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, माजी खासदार व माजी आमदार, प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष/कार्याध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व गटनेते हे या कार्यकारिणीत ‘कायम निमंत्रित सदस्य’ म्हणून समाविष्ट असणार आहेत.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपापल्या स्तरावरून तात्काळ नियुक्तीपत्रे देण्याचे निर्देश प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले आहेत. या नवीन निवडीमुळे बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक आणि बळकट होईल असा विश्वास राहुल सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.