#निधन वार्ता
कल्पना चाटे यांचे अल्पशा आजाराने निधन…..!


दिवंगत कल्पना चाटे या आपल्या अत्यंत प्रेमळ, शांत, मनमिळावू व आपुलकीच्या स्वभावामुळे सर्व परिचितांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. त्या केज तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांच्या मोठ्या भगिनी होत.
त्यांच्या पश्चात पती कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे, मुलगी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, ॲड. अमिता चाटे, मुलगा ॲड. संकेत चाटे, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.