महाराष्ट्रब्रेकिंग

खरीप २०२६ साठी राज्यातील २६५ तालुक्यांत प्रथम कळ (Trigger-१) अंतर्गत दुष्काळ जाहीर…..!

9 / 100 SEO Score

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील खरीप २०२६ च्या हंगामात पावसाची तूट व इतर घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये प्रथम कळ (Trigger-1) अंतर्गत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६ च्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी या सर्व ११ तालुक्यांचा समावेश आहे. या शासन निर्णयानुसार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बाधित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे, जीपीएस (GPS) कोऑर्डिनेट आणि छायाचित्रांसह पीक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी राज्य शासनाने विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, ७.५ हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी, रोहयो (MGNREGA) अंतर्गत कामाचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय करणे, शेती पंपांची वीज जोडणी न तोडणे, शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची टंचाई भासू न देणे आणि जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करणे या प्रमुख सवलतींचा समावेश आहे. दरम्यान, बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close