#निधन वार्ता

बोबडेवाडी येथील दहावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल….!

6 / 100 SEO Score
केज दि. २१ – तालुक्यातील बोबडेवाडी येथील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी (दि. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
              मयत विद्यार्थ्याचे नाव आकाश नितीन बोबडे (वय १६, रा. बोबडेवाडी) असे आहे. तो गोटेगाव ता. केज येथील सम्राट अशोक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो अभ्यासातही हुशार होता. मात्र आज दुपारी त्याचे आई-वडील शेतात कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्याने घरात हे टोकाचे पाऊल उचलले. दुपारी घरी आल्यावर ही घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे बोबडेवाडी सह गोटेगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.                    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे, मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे.   केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close