#Accident

माजलगाव-तेलगाव रस्त्यावर एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू

माजलगाव, दि. १८: माजलगाव-तेलगाव रोडवरील हॉटेल शिवराज जवळ आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पाथरुड (तेलगाव-माजलगाव मार्ग) येथे एसटी बस क्रमांक (MH-२०-२७४०) आणि हुंडाई कार क्रमांक (MH-२६ AK ४२१०) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून कार एसटी बसच्या खाली घुसला होता. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृत व्यक्ती हे माजलगाव शहर व तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण आणि मृतांची नावे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, या दुर्दैवी व मर्मभेदी घटनेमुळे माजलगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close