राजकीय

महायुतीचे उमेदवार आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ संवाद मेळावा…..!

7 / 100 SEO Score

अंबाजोगाई दि. २० – छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मंत्री तथा आ.धनंजय मुंडे, आ.नमिताताई मुंदडा, शिक्षक मतदारसंघाचे आ.विक्रम बप्पा काळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी दु.१२.२५ वा अंबाजोगाई येथील अनिकेत मंगल कार्यालयात जाहीर सभा आणि पदवीधर संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजभाऊ औताडे,भाजप तालुकाध्यक्ष संतोष (नाना) भगत, गोकुळ कदम,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी केले आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश भानुदासराव चव्हाण हे गेल्या तीन टर्मपासून विधान परिषदेवर पदवीधरांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या कार्यकाळात त्यांनी पदवीधर, शिक्षक आणि मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महायुतीने त्यांना चौथ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.

अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील पदवीधर मतदारांनी यापूर्वी आमदार सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिलेला आहे. यंदाही पदवीधर मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने मिळेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रचाराला गती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला केज विधानसभा मतदारसंघाच्या राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ.नमिताताई मुंदडा, शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रमबप्पा काळे, माजी आ.संजयभाऊ दौंड, माजी आ.प्रा.संगीताताई ठोंबरे, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी, पणगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,भाजपचे राज्य प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख ॲड.राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख डॉ. प्रतिभाताई थोरात, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दत्तात्रय पाटील, माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे, जि.प.सदस्य बालासाहेब शेप, परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख,माजी जि.प.सदस्य राजपाल लोमटे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या पदवीधर मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या नेत्यांकडून आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचाराची भूमिका मांडण्यात येणार असून, पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजभाऊ औताडे,भाजप तालुकाध्यक्ष संतोष (नाना) भगत, गोकुळ कदम ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close