#Accident
विद्युत तारांमुळे ऊस जळून खाक…..!
केज दि. २३ – तालुक्यातील नायगाव येथे महावितरणच्या लोंबत्या विद्युत तारांमुळे झालेल्या शार्ट सर्किटमुळे महारुद्र, नितीन व सचिन गुजर या तीन शेतकऱ्यांचे तयार झालेले ऊस पीक जळून खाक झाले असून, यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे लागवड व मशागतीचा खर्च वाया गेला असून, नुकसान टाळण्यासाठी संबंधित साखर कारखान्याने जळालेला ऊस तातडीने स्वीकारून त्याची तोडणी व वाहतूक करावी आणि प्रशासनाने तातडीने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने परिसरातील धोकादायक तारांची त्वरित दुरुस्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
