#Accident

केज धारूर रोडवर अपघात…..!

9 / 100 SEO Score

केज दि.१ – केज धारूर रोडवर तांबवा पाटीजवळ कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

                रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान संतोष खंडागळे आणि महादू शिंदे हे केज धारूर रोड वरून प्रवास करत असताना त्यांची कार रोडच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. यामध्ये संतोष खंडागळे आणि महादू शिंदे (कळंब) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
                     दरम्यान सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे पायलट मकरंद घुले आणि डॉ. शरद गीते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close