#Crimeक्राइम

जिवाचीवाडीत अवैध सावकारी प्रकरणी धाड; ५५ कोरे धनादेश, ४ खरेदीखतांच्या प्रती जप्त….!

6 / 100 SEO Score

केज दि.१९ : तालुक्यातील जिवाचीवाडी येथे अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१९) कारवाई केली. या झडती मोहिमेत संशयित व्याज व्यवहाराच्या हिशेबाच्या नोंदी, ५५ कोरे धनादेश आणि ४ खरेदीखतांच्या प्रती जप्त करण्यात आल्या असून सावकारी कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.

सहकार विभागाकडे केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील राजाभाऊ सुखदेव केदार यांच्याविरोधात विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराबाबत तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत केदार यांच्या राहत्या घरी सहकार व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकामार्फत झडती व तपासणीची कार्यवाही पार पाडण्यात आली. या तपासणीदरम्यान पुढील चौकशीसाठी संशयित व्याजाच्या हिशेबाचे कागदपत्र, एकूण ५५ कोरे धनादेश आणि ४ खरेदीखतांच्या प्रती ताब्यात घेण्यात आल्या असून, सावकारी कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई लातूरचे सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण आणि सहकारी संस्थाचे बीड जिल्हा उपनिबंधक सतिष तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचाऱ्यांनी या मोहिमेसाठी आवश्यक प्रशासकीय मदत व संरक्षण पुरवले. पथक प्रमुख म्हणून केजचे सहकारी संस्थाचे सहायक निबंधक शिवराज नेहरकर तर पथक सहायक म्हणून एम. एस. वहावळे, व्ही. के. इंगळे यांनी ही कामगिरी बजावली.

तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन

अवैध सावकारी करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केजचे सहायक निबंधक शिवराज नेहरकर यांनी केले आहे. अशा व्यक्तींविरोधात बीड येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा संबंधित तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार दाखल करावी. धाडीच्या कार्यवाहीपर्यंत तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवून संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close