वयाच्या चौदाव्या वर्षी प्रेमात पडले होते…….जीव तुटणार नाही का? गोस्वामीच्या अटकेवर अक्षता नाईक यांनी दिली प्रतिक्रिया……..!
मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली.
माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती, आज महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे, असं अक्षता नाईक म्हणाल्या आहेत.
नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, आज करवाचौथला त्याचं फळ मिळालं, अशा भावना अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी व्यक्त केल्या.
गाडीवर दोन बाटल्या फेकून मारल्या, तर त्रास होतो. माझ्या घरातील दोन प्रियजन गेले आहेत. नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, वयाच्या चौदाव्या वर्षी. माझा जीव तुटणार नाही का? आज करवाचौथ आहे, हे त्याचंच फळ आहे, असं अक्षता नाईक यांनी म्हटलंय.