क्राइम

केजमध्ये मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले शिक्षकाचे पावनेदोन लाख रुपये लांबविले !

बीड दि.४ – केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील एका शिक्षकांने बँकेत भरणा करण्यासाठी मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले चार लाख रुपयापैकी एक लाख ७० हजार रुपये चक्क बँकेच्या दारातूनच अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना मंगळवार दि.३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:००वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
        तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील शिक्षक देविदास गंगाधर कदम यांनी बँकेत भरणा करण्यासाठी चार लाख रुपये घरीहून मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवून मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केज कळंब रोडवरील भारतीय स्टेट बंँकेच्या  मोंढा शाखेत आले. त्यांनी आपली मोटारसायकल क्र.एम.एच.-४४-व्ही-८०२५ ही मोटारसायकल कळंब रोडवरील बँकेसमोर लावली.सदर
मोटारसायकलच्या डिक्कीत आणलेले चार लाख रुपायापैकी दोन लाख तीस हजार त्यांनी डिकीतून काढले व उर्वरित रक्कम एक लाख ७० हजार रुपये मोटारसायकल च्या डिकीत ठेवून बँकेच्या आत गेले.  बँकेत दोन लाख ३० हजार रुपये भरणा केले व पैसे भरणा केल्यानंतर परत ते बँकेबाहेर लावलेल्या मोटारसायकल जवळ आले.परंतु त्यांना मोटारसायकलची डिक्की उघडी असल्याचे दिसून आले.तेव्हा त्यांनी पाहिले असता डिक्कीचे कुलूप कुणीतरी अज्ञात इसमाने तोडून डिक्कीत ठेवलेले एक लाख ७० हजार रुपये गायब झाले असल्याचे दिसून आले. देविदास गंगाधर कदम यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु.र.न.४६८/२०२० कलम ३७९ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ. रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close