महाराष्ट्र

दोन बळी गेल्यानंतर सरकारला आली जाग…..एका तासात चालू महिन्याचे वेतन खात्यावर जमा करण्याचे आश्वासन……!

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार असून, तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याचीही माहिती अनिल परबांनी दिली आहे.

दिवाळीपूर्वी अजून एक महिन्याचे वेतन असे एकूण थकीत दोन महिन्यांचे वेतन दिलं जाणार आहे. हे तात्पुरते संकट आहे, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नका, ही नम्र विनंती, असं आवाहनही अनिल परब यांनी केलंय.

दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे. आजच एका तासात एक पगार आणि सणाची अग्रिम रक्कम देण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिलीये.

कृपया आत्महत्या करू नका, तुमच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर ओढावणारं संकट फार मोठं असेल. सध्याचं संकट तात्पुरतं आहे. यावर लवकरच मार्ग काढू, पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन अनिल परब यांनी दिलंय.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close