महाराष्ट्र

नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; अधून मधून योगा करत जा….…!

मुंबई | अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ करत टीका केली होती. यानंतर आता शिवसेनेकडूनही अमृता फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवरून अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी निलम गोऱ्हे यांनी फडणवीसांना त्यांचं मानसिक स्वास्थ जपा, असा टोला लगावलाय.
          “अमृताताई, या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील”अ”मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मनस्वास्थ चांगले राहते असे ट्विट गोऱ्हे यांनी केले आहे.

“शिवसेनाच आजही रुग्णवाहिका आणि अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर ‘मृता’ राहील. शिवसेनेची काळजी करु नका, आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे ‘अ’योग्य बरे का”, अशी बोचरी टीकाही निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close