आपला जिल्हा

मासे पकडणे जीवावर बेतले,शॉक लागून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, ऐन दिवाळीत गावावर शोककळा

बीड -13 – धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे (दि.१२) गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास नदीत करंट सोडून मासे पकडत असताना शॉक लागून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
         सध्या सर्वत्र नदी ओढ्यात माशांचे प्रमाण असल्याने तरुण वेगवेगळ्या पध्दतीने मासेमारी करतात. नदीत विजेचे करंट सोडून मासेमारी करण्याचा जीवघेणा प्रकार रात्री समोर आला. तालुक्यातील भोगलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या काळ्याचीवाडी येथे या प्रकारातून दोन तरुणांचा जीव गेल्याची घटना घडली. अंधार पडला असताना दोघे घरी परत आले नसल्याने शोध घेत असताना सदरील प्रकार उघड झाला. पाण्यात करंट सोडून मासे धरत असताना त्याच पाण्यात उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात समाधान सहदेव रुपनर व दिपक मारुती रुपनर या दोन अठरा ते वीस वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. सदरील प्रकारामुळे ऐन दिवाळीत रुपनर कुटूंबियावर व गावावर दुखाचा डोंगर कोसळला असुन गावात शोककळा पसरली आहे. सदरील तरुणांचे प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असुन धारुर पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close