राजकीय

सध्या मंत्रालयाचा पत्ता म्हणजे कृष्णकुंज – संदीप देशपांडे

मुंबई – समस्यांचे समाधान करून घेण्यासाठी मागच्या आठ महिन्यांपासून कित्येक लोकांनी राज ठाकरे यांचा दरवाजा ठोठावला आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय तसंच उद्योग धंद्यांवर परिणाम झाल्याचं दिसून आलंय. यासाठी अनेक संघटनांना त्यांच्या मागण्यांसाठी थेट कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता म्हणजे कृष्णकुंज, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.

संदीप देशपांडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28.” देशपांडे यांचं ट्विट सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

लॉकडाऊननंतर राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेकांच्या समस्या सोडवण्यात देखील आल्या.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close