महाराष्ट्र

भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात

मुंबई –  पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी आज जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेसाठी घराबाहेर पडताच राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राम कदम निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

            राम कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्यानंतर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे.पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊन देखील अजून कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ ही यात्रा कदम यांनी काढली होती. शिवाय हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close