आपला जिल्हाक्राइम
अवघ्या कांही महिन्यातच नवविवाहित पतीपत्नीने संपवली जीवनयात्रा…….परळी तालुक्यातील घटना……!
परळी दि.२ – तालुक्यातील पांगरी कॅम्प येथे मंगळवारी रात्री नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून तर तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रियंका सायस पंडित (वय 19) व सायस पंडित वय (25 )अशी मृत्यू पावलेल्या पती -पत्नीची नावे आहेत. पांगरी कॅम्प येथे घटनास्थळी जाऊन परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पूर्भे यांनी भेट दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील प्रियंका व सायस यांचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. घरगुती कारणावरून या दोघांत वाद झाले.त्यातूनच प्रियंका हिने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी परळी च्या रुग्णालयात आणले असता तिचा मृत्यू झाला.
दरम्यान रात्री अकराच्या सुमारास तिचा पती सायस पंडित यांनी पांगरी कॅम्प येथे एका घरात गळफास घेतला. सायस यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आणण्यात आले होते. मात्र त्यांचाही मृत्यू झाला. तर बुधवारी सकाळी प्रियंकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालय येथे आणण्यात आला. दोन्ही बाजूचे नातेवाईक उपजिल्हारुग्णालयात आले आहेत जमले होते तर परळी ग्रामीण चे पोलिसही पुढील कार्यवाही करत असून आत्महत्या नेमकी कोणत्या करणातून झाली? हे पोलीस तपासात निष्पन्न होईल.