आपला जिल्हा

ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाने बीड शहर दणाणले……!

बीड दि.8 – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच इतर सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो ओबीसी बांधव उपस्थित राहिल्याने बीड शहर दणाणून गेले होते.
          मंगळवारी (दि.8) रोजी सकाळी 11 वाजता स्टेडियम पासून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला. समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात समता परिषदेचे पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, श्री.हाके, कर्डक यांची प्रमुख उपस्थिती होती.सदरील मोर्चासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव सामील झाले होते. यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
      दरम्यान सदरील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्यानंतर पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सुभाष राऊत, श्री, हाके, कर्डक यांनी मार्गदर्शन केले. तर निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी निवेदन स्वीकारले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close