क्राइम
गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव कोरलेल्या तरुणाची आत्महत्या……! सुसाईड नोट मध्ये एक कोटीचा उल्लेख…….!
बीड दि.१२ – गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झालेला व चार कंपन्यांचा मालक असलेला मुंबईचा तरूण व्यावसायिक पंकज कांबळे याने इंदूरमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
इंदुरमधील एका मोठ्या हॉटेलच्या रुममध्ये पंकजने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची इंदुरच्या कनाडिया पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनेची माहिती मिळाताच पंकज चे कुटुंबीय इंदुरमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान आत्महत्या करण्या अगोदर पंकजने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नीलम नावाच्या तरूणीचा उल्लेख करत, आय लव्ह यू नीलम असं लिहिलेलं आढळून आलं आहे. या सुसाइड नोटच्या आधारावर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.आत्महत्या करण्या अगोदर पंकजने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आपल्या बँक खात्यात 1 कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे.