राजकीय

”ते” तर मोठ्या माणसांचा पदर धरून पुढे आलेत……….! जावयाचा सासऱ्यावर प्रहार……..!

बीड दि.१२ – औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्ते आंदोलन करत होते. या आंदोलनाला रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली.

रावसाहेब दानवे यांचं कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

           मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी  जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. जर दुपारी 4 वाजेपर्यंत माफी मागितली नाही, तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, असा इशारा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close