क्राइम

पोटच्या दोन मुलांची हत्या करून महिलेने स्वतः ही केली आत्महत्या

बीड दि.१६ – डोक्यात एखादी गोष्ट बसली की कांही लोक काय करतील हे सांगता येत नाही. असाच कांहीसा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनं नवरी सारखा श्रृंगार करुन आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या करुन, स्वत: आत्महत्या केली. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर महिला अंगणवाडीत सहाय्यक म्हणून काम करतं होती. या महिलेनी आपल्या 6 आणि 3 वर्षांच्या मुलांना गळफास देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या करुन स्वत:ला संपवलं.

पोलिसांच्या तपासादरम्यान उघड झालेल्या प्रकारात, दोन महिन्यांपूर्वी मृत महिलेची प्रस्तुती झाली होती. परंतू जन्माला आलेल्या बाळाचा दोन महिन्यांनंतर मृत्यू झाला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मृत महिलेनी या घटनेचा मोठा धस्का घेतला होता.

दरम्यान, त्या तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या आत्महत्येमागचं नेमक कारण स्पष्ट झालं नसून, पोलिस त्याचा तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close