क्राइम

“या” महिला नेत्याचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी……..!

पुणे दि.26 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याचा धमकीचा फोन आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील धायरी भागात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका इसमाचा फोन आला असता चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी तो उचलला.फोनवरून मी जयंत रामचंद्र पाटील बोलत असून मला रूपाली चाकणकर यांचा मोबाईल नंबर दे, ती काय करते ते बघतोच, तसेच तुला माहिती नाही का मी कोण आहे ते, तुला तुमचे कार्यकर्ते किंवा पोलिस बोलवायचे असतील तर बोलव, मी घाबरत नाही असे म्हणत तुमचे कार्यालय पेटवून देईन अशी धमकी इसमाने फोनवरून दिली.

ज्या कुणी अनोळखी व्यक्तीने फोन करून अशा पद्धतीने भाषा वापरून धमकीचा फोन केला आहे. त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close