#Social

पुन्हा अशी चूक केली तर भर चौकात जोड्याने मारू…..….!

मुंबई  दि.१७ – सैफअली खान, डिम्पल कपाडिया यांची मुख्य भूमिका असलेली तांडव ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापुढे चित्रपट विश्वातील लोकांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्यास त्यांना भरचौकात जोड्यानं फटकावलं जाईल, असं भाजप नेते राम कदम म्हणाले आहेेेत.

               कोणत्याही परिस्थितीत तांडव या वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येईल. त्या सीरिजचे अभिनेते दिग्दर्शकांवर एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यांनी हिंदू देवीदेवतांचा अवमान करण्याचं कृत्य केलं आहे. त्यांनी हात जोडून, गुडघे टेकून समस्त देशाची आणि हिंदू समजाची माफी मागायला हवी, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम कदम यांनी तांडव या वेब सीरिजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close