#Corona
आजच्या अहवालात बीड जिल्ह्यात 38 रुग्ण पॉजिटिव्ह, केज तालुक्यातील तिघांचा समावेश
![](https://i0.wp.com/sakriynews.in/wp-content/uploads/2020/12/IMG-20200525-WA0003.jpg?resize=730%2C420&ssl=1)
बीड दि.22 – आज प्राप्त झालेल्या 628 कोरोना तपासणी अहवालात जिल्ह्यात 38 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये केज तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे.
यामध्ये केज तालुक्यातील सारणी सांगवी येथिल 52 वर्षीय महिला, साळेगाव येथील 33 वर्षीय पुरुष तर शहरातील समर्थ नगर भागातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दरम्यान जिल्ह्यात बीड 19, अंबाजोगाई 10, आष्टी 1, माजलगाव 1, परळी 2, शिरूर 2 असे एकूण 38 रुग्ण आढळून आले आहेत.