#Accident

औंढा नागनाथ नांदेड दरम्यान अपघात, केज तालुक्यातील शिक्षक ठार…..!

30 फूट नदीत कोसळली गाडी

केज दि.२४ – औंढा नागनाथ वरून देवदर्शन करून नांदेड कडे आजारी नातेवाईकाला भेटण्यास निघालेल्या विठ्ठल विद्यालय सारणी सांगवी (ता.केज) शाळेवरील शिक्षकाच्या गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सारंग बळीराम काळे (रा.जीवाची वाडी ता.केज) असे मृत शिक्षकाचे नाव असून टायर फुटल्याने गाडी पूर्णा नदीवरून खाली पडल्याने सारंग काळे हे जखमी झाले होते. दरम्यान त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अन्य तिघेही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदरील अपघात दि.24 रोजी सकाळी 10.30 वाजता झाला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close