#Social

ओबीसी आणि भटक्या समाजावर हे सरकार अन्याय करतंय – पडळकर

नागपूर दि.31 – महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात का थरथरतात?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केला आहे. महाज्योती संस्थेला 500 कोटी रुपयांचा निधी मिळावा, या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपुरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

अजित पवार एका दिवसात सार्थी संस्थेला निधी देतात. मग महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?. या सरकारने जाणीवपूर्वक महाज्योतीला निधी दिला नाही, असं पडळकरांनी म्हटलंय. महाज्योती संस्थेला फडणवीस सरकारने 320 कोटी रुपये दिले होते. पण सध्याच्या राज्य सरकारकडून महाज्योती संस्थेकडे दुर्लक्ष केलं जातंय. ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close