#Social

”माझ्या मुलांचा सांभाळ करा” असे स्टेटस ठेवून शेतकऱ्याची आत्महत्या….!

परभणी दि.3 – ”माझ्या मुलांचा सांभाळ करा” असे भावनिक स्टेटस ठेवून परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा गावामधील एका शेतकऱ्याने कर्जवसुलीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.चंद्रकांत भगवान धोंडगे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
          धोंडगेंनी आत्महत्येपुर्वी मला पैशासाठी धमक्या येत असून, त्यामुळं मला त्रास झाला आहे. माझ्यानंतर माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी मी शेतात आहे सर्वांनी यावे असे व्हाट्सएपवर धोडगेंचं स्टेटस पाहता त्यांचे काका हणमंत धोंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीनं चंद्रकांत धोंडगे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

                दरम्यान, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी चंद्रकांत धोंडगेंना मृत घोषित केलं. तसंच आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close