#Missing

आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ करून गायब झालेल्या महाराजांची कोर्टात धाव……!

बीड दि.22 – विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडीओ व्हायरल करुन गायब झालेल्या आणि तब्बल 15 दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देणार्‍या गेवरई तालुक्यातील काळेगाव येथील हनुमान महाराज गिरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा जामिना अर्ज न्यायालयात दाखल झाला आहे. 
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सुर्य मंदिर संस्थानातील हनुमान महाराज गिरी यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी तसेच बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गून्हा दाखल आहे. परंतू सदरचा गून्हा हा केवळ ब्लॅकमेंलीगसाठी असून गावातील राजकिय पुढारी, पत्रकार, यांनी तसेच फिर्यादीच्या नातेवाईक यांनी मला चार लाख रूपयाची मागणी केली होती.  मी ती मागणी पुर्ण केली नाही म्हणून माझ्यावर खोटा गून्हा दाखल केल्याने मी आत्महत्या करत आहे असा व्हिडीओ हनुमान महाराज यांनी सोशलमिडीयावर व्हायरल केला होता. या व्हिडीओने सर्वत्र खलबळ माजली मात्र तेव्हापासून हनुमान महाराज गायब होते. महाराज नेमके कोठे आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेत होती. अखेर महाराज पंढरपूरला असल्याची माहिती मिळाली होती.

         दरम्यान आता पोलीसांना गुंगारा देणार्‍या हनुमान महाराज गिरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी थेट बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्या.के.आर.पाटील यांच्यासमोर हनुमान महाराज गिरी यांचे अटकपूर्व जामिनाचे प्रकरण चालणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close