महाराष्ट्र
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी तक्रार देण्यासाठी शांताबाई राठोड पुण्यात दाखल……!
पुणे दि.२८ – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यात भर म्हणून आता पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. तसेच त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं सांगितल्या जात आहे. तर शांताबाई राठोड या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करणार असल्याचे बोलल्या जात आहे.
पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या मृत्यूबाबत आक्रमक पवित्रा धारण केला आहे. जोपर्यंत पूजाच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत वानवडी पोलीस ठाण्यातून निघणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या फिर्यादीमध्ये त्या वनमंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे.