केज दि.२८ – केज तालुका सक्रीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सोनवणे यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली.
अध्यक्ष निवडीसाठी सक्रीय पत्रकार भवनात दि.२८ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते संतोष सोनवणे यांनाच २०२१ साठी कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सदरील ठरावाला सर्वानुमते मान्यता देऊन संतोष सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सक्रीय पत्रकार संघाचे सदस्य मधुकर सिरसट, श्रावनकुमार जाधव, डी. डी. बनसोडे, दिपक नाईकवाडे, रामदास तपसे, संतोष गालफाडे, मकसुद फारोखी, माजेद शेख, रामदास साबळे, हनुमंत सौदागर, सादत मंत्री, रियाज फारोखी, महादेव गायकवाड, सचिन उजगरे, सोमनाथ लामतुरे, शरद राऊत, विनोद ढोबळे यांची उपस्थिती होती.